माळेगावच्या गळीत हंगामाचा शुभारंभ
माळेगाव – माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा हंगाम २०२४- २०२५ या वर्षांचा ६८ या गळीत हंगाम शुभारंभ कारखाना कार्यक्षेत्रातील प्रती एकरी १०० टन ऊस उत्पादन घेणा-या सभासदांचे हस्ते पार पडला.
यावेळी चेअरमन केशवराव सर्जेराव जगताप, व्हाईस चेअरमन तानाजीराव देवकाते, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब पाटील तावरे, सागर जाधव, बन्सीलाल आटोळे, तानाजी कोकरे, संजय काटे, योगेश जगताप, सुरेश खलाटे, अनिल तावरे, मदनराव देवकाते, प्रताप आटोळे, नितीन सातव, राजेंद्र ढवाण, स्वप्नील जगताप, पंकज भोसले, संगीता कोकरे, अलका पोंदकुले, मंगेश जगताप, निशिकांत निकम, दत्तात्रय येळे, विलास कोकरे, कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील उपस्थित होते.
एकरी शंभर मेट्रीक टन ऊस उत्पादन घेणा-या सभासदामध्ये प्रामुख्याने सुनीता व ॲड संजय यशवंत जगताप, धीरज संजय जगताप, आशाबी व जैनुद्दीन साहेबलाल मुजावर, सुमन व सुर्यकांत रघुनाथ बनकर, सोनकसवाडी, उर्मिला व राजेंद्र लालासाहेब जगताप, दीपाली व मंदार सोलणकर, सिंधु व माधव बाबासो बनकर, पणदरे,
सुवर्णा व सोमनाथ हरिभाऊ नवले, वर्षा व रमेश दत्तात्रय शिर्के, मीनाक्षी व रोहिदास दत्तात्रय सांगळे, मंदाकिनी व रमेश शंकरराव गोफणे माळेगाव, सुरेखा व पोपट श्रीरंग तावरे सांगवी, सारिका व अंबादास मारुती जगताप, मानाजीनगर, अरविंद रामचंद्र जगताप, पवईमाळ, लक्ष्मण दगडु धायगुडे, नीरावागज, पद्मीमी व सुरेश चंदरराव काळे, मुख्य ऊस विकास अधिकारी आदी मान्यवरांच्या हस्ते गव्हाण पूजन करून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. उर्मिला राजेंद्र जगताप यांनी आभार मानले.
१५ लाख टनाचे गाळपाचे उदिष्ट
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील म्हणाले की, येणारा हंगाम १५ नोव्हेंबरला सुरु होणार आहे. त्यामुळे आपण सभासदांचे आडसाली उसास प्राधान्याने तोड देणार आहोत. येत्या हंगामात १४ ते १५ लाख टनाचे गाळपाचे उदिष्ट आहे. केंद्र शासनाने २०२४- २०२५ हंगामासाठी मूळ एफआरपी जाहीर करताना रिकव्हरी बेस १०.२५ टक्के रुपये ३१५०. रुपयांवरुन ३४०० प्रमाणे एफआरपीमध्ये वाढ केलेली आहे. एमएसपीमध्ये मात्र वाढ होत नाही. राज्य शासनाने तसेच साखर संघ, नॅशनल फेडरेशनने एमएसपी ४० रुपये प्रती किलोप्रमाणे करण्यासाठी शिफारस केली आहे. परंतु अद्याप एमएसपी वाढली नाही. कारखान्यातील अंतर्गत कामे पूर्ण झाली आहेत. कारखान्याने अदा केलेला ३६३६ रुपये प्रति टन भाव हा राज्यात उच्चांकी आहे. यात सर्वांचे मोठे योगदान आहे.