सणसवाडीत रास्ता रोको, निवेदन
सणसवाडी – येथील सर्वपक्षीय कार्यकर्ते, महिलांनी सणसवाडी चौकात शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांना निनावी पत्राद्वारे दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आला होता.
यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, तसेच महिलांनी आरोपीचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत निवेदन दिले. यावेळी कॉंग्रेसचे नेते महेश ढमढेरे, तालुकाध्यक्ष वैभव यादव, शिवसेना पुणे जिल्हा उपप्रमुख अनिल काशिद , तालुका प्रमुख अमोल हरगुडे, शाखा प्रमुख सोमनाथ शेळके, भाऊसाहेब हरगुडे, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडीत दरेकर, सरपंच सुनंदा दरेकर, माजी सरपंच दता हरगुडे, सुरेश हरगुडे, वर्षा कानडे, शिवाजी दरेकर, शशिकला सातपुते, वढुचे साहेबराव भंडारे, माजी अध्यक्ष पांडुरंग हरगुडे,
सुहास दरेकर, बबुशा दरेकर, विद्यमान अध्यक्ष शरद दरेकर, उपसरपंच ऍड. विजयराज दरेकर, नवनाथ हरगुडे, ग्रामपंचायत सदस्य सागर दरेकर, रामदास दरेकर, दतात्रय हरगुडे, मारूती दरेकर, रामभाऊ दरेकर, सुनिता दरेकर, स्नेहल भुजबळ, सुनिता दरेकर, अमोल हरगुडे, आपटीचे नवनाथ शिवले, धानोरीचे हरीष येवले, योगेश शितोळे, सुनील भोसुरे, राजेंद्र नरवडे उपस्थित होते.
यावेळी परिसरातील दरेकरवाडी, धानोरे, वढु, आपटी, पिंपळे, खंडाळे, शिक्रापूर, तळेगाव, कोरेगाव भीमा, वाडा, पेरणे अशा गावांमधून कार्यकर्ते उपस्थित होते.
शिंदोडी, निमोणेत सर्वपक्षीय निषेध
निमोणे -शिरूर-हवेलीचे आमदार ऍड अशोक पवार यांच्यासह त्यांना कुटुंबातील व्यक्तींना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ शिरूर तालुक्याच्या पुर्व भागातील निमोणे, शिंदोडी, गुनाट या गावात सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर सभा घेऊन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तसेच असे भ्याड कृत्य करणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांना लवकरात अटक करावी, अशी मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली.
शिंदोडी गावात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य एकनाथ वाळुंज यांच्या नेतृत्वाखाली निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पोलीस पाटील भास्कर ओव्हाळ, शिवशंभु जिजाऊ सेनेचे संस्थापक अध्यक्ष योगेश ओव्हाळ, शिरुर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस रामकृष्ण गायकवाड, शिरुर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस विमुक्त जाती मागासवर्गीय फ्रंटलर सेलचे उपाध्यक्ष कृष्णा माने, माजी सरपंच रंगनाथ वाळुंज, भगवंत वाळुंज, विकासोचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज, शिवाजी वाळुंज, भाऊसाहेब वाळुंज, शिवाजी ओव्हाळ, चंद्रकांत ओव्हाळ, प्रकाश शिंदे, श्रीपाद वाळुंज, योगेश वाळुंज, शिवाजी ओव्हाळ, परशुराम ओव्हाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
गावचे माजी सरपंच पांडुरंग दुर्गे, अमोल थोरात, दिलीप काळे, ग्रा.पं.सदस्य प्रशांत अनुसे, संदीप गव्हाणे, शरदभाऊ काळे, अंकुश जाधव, ज्येष्ठ नेते माऊली काळे, शशिकांत काळे, राहुल पवार, धोंडीभाऊ कोळपे, रवी गडकर इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान व्हिडिओ कॉलद्वारे आमदार अशोक पवार यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. यावेळी निमोणेचे सरपंच शामकांत काळे, सदस्य संजय काळे, भाजपचे जालिंदर काळे, शिवसेनेचे आनंदराव ढोरजकर, माजी सरपंच पांडुरंग दुर्गे, अमोल थोरात, घोडगंगाचे माजी संचालक शांतीलाल होळकर, माजी सरपंच बबन आनुसे, ज्येष्ठ नेते माऊली काळे, शशिकांत काळे, राहुल पवार, शांतीलाल काळे, दत्तात्रय जाधव, विजय पोटे, रवींद्र काळे, उत्तमराव हिंगे, संदीप ताठे, संतोष जगदाळे, दत्तात्रय थोरात, बाळासाहेब काळे, सतीश काळे उपस्थित होते.