राजगुरूनगर (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील चास कमान धरणातून भिमा नदीत ३० हजार क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात येत असल्याने धरणाखलील नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
भीमाशंकर भोरगिरी परिसरात गेली दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे . त्यामुळे आरळा आणि भिमनदीला मोठा पूर आला आहे या दोन्ही नद्यांचे पाणी चास कमान धरणात जमा होत आहे.
४८ तासात भीमाशंकर भोरगिरी परिसरात सुमारे ५०० पेक्षा जास्त मिलिमीटर पाऊस झाला आहे. चासकमान धरणात येवा वाढल्याने धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून ३० हजार क्यूसेस वेगाने पाणी भिमा नदीत सोडण्यात येत आहे.
धरणाखाली भिमा नदीला मोठा पूर आला आहे. यासह भामा आसखेड धरणातून सुमारे 5 हजार क्यूसेस वेगाने पाणी भामा नदीत सोडले जात आहे.
खेड तालुक्यातील तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत असल्याने नद्या नाले l. दुथडी भरून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे भात खाचरे आणि भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.