पुणे – जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत मागील चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यात सोमवारी एकूण 213 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस हा वेल्हा तालुक्यात झाला असून याठिकाणी 55.75 मिमी इतका पाऊस पडला आहे. त्याखालोखाल मुळशीमध्ये 38 मिमी आणि मावळमध्ये 27 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जून महिन्यात सरासरीच्या 151 टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. तर जून महिन्यात एकूण 1975 मिमी पाऊस पडला आहे. जूनमध्ये सर्वाधिक पाऊस हा वेल्हा तालुक्यात झाला असून याठिकाणी 353 मिमी पाऊस झाला आहे. मुळशीमध्ये 282 मिमी, भोरमध्ये 173 मिमी, मावळमध्ये 321 मिमी, हवेली तालुक्यात 86 मिमी, आंबेगावमध्ये 116 मिमी, बारामतीमध्ये 39 मिमी, इंदापूरमध्ये 35 मिमी, दौंडमध्ये 60 मिमी आणि पुरंदरमध्ये 129 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मुळशी, मावळ, भोर, खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि पुरंदर या आठ तालुक्यांत दि. 1 जूनपासून 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे.