शिक्रापूर -सणसवाडी (ता. शिरूर) येथे एका चहा विक्रेत्या महिलेचा दोघांनी विनयभंग करत महिलेसह पतीलादेखील मारहाण केल्याची घटना घडली आहे, याबाबत पिडीत महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सोमेश्वर काकडे व परमेश्वर काकडे (दोघे रा. सणसवाडी ता. शिरूर) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
सणसवाडी येथे पिडीत महिलेचे चहा विक्रीचे दुकान आहे. महिला त्या ठिकाणी असताना अचानकपणे सोमेश्वर काकडे त्या ठिकाणी आला आणि त्याने महिलेचा विनयभंग केला.