मंचर -पेठ-बारामनवस्ती (ता. आंबेगाव) येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीप्रकरणी विनयभंग करणाऱ्यासह दोघांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि. 29) पेठ-बारामनवस्ती येथील 15 वर्षीय मुलगी भाजीपाला आणण्यासाठी जात असताना किशार दत्तात्रय रागमहाले (रा. पेठ) याने या मुलीचा विनयभंग केला.
याबाबत पिडीत मुलीच्या आईने व भावाने रागमहाले याच्याकडे विचारणा केली असता तिच्या भावाला खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करून दुखापत केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. मुलीने किशोर रागमहाले यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात विनयभंगाची फिर्याद दिली आहे.