राजगुरुनगर -डेहणे (ता. खेड) येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका युवकाविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अमोल नाथाजी तिटकारे (वय 25, रा. नायफड, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अल्पवयीन मुलगी वर्षभरापूर्ती बाजारहाट करण्यासाठी वाडा येथे आली होती. दरम्यान तिटकारेने मुलीची छेडछाड केली होती. झालेला प्रकार घरी सांगू नको मी परत असे करणार नाही असे सांगुन झालेले प्रकरण मिटवले होते.
4 महिन्यांपूर्वी पीडिता डोंगरावर शेळ्या राखण्यास गेली होती. त्यावेळी तिटकारे तिथे जाऊन मी तुझ्यावर प्रेम करतो मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे अमिष दाखवून जबरदस्तीने दोनवेळा बलात्कार केला. तर अधूनमधून तिला भेटत होता.
दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलीला दिवस गेले. चार महिन्यांची गर्भवती राहिल्यांनी हा प्रकार उघडकीस आल्याने पीडितेच्या आईने पोलीस ठाणे गाठले. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक वर्षाराणी घाटे करित आहे.