पुणे जिल्हा : केसनंद येथील बँकेचा कारभार रामभरोसे

वाघोली : पुणे जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केसनंद शाखेचा उद्घाटन सोहळा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला होता मात्र आता ह्या बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या त्रासांमुळे शाखा चर्चेत आली आहे. त्यामुळे या बँकेचा कारभार रामभरोसे असल्याचे दिसून येऊ लागले आहे.
दि. १९ रोजी एका खातेदाराने शाखेत भरलेल्या पैशांचा खातेदारांच्या खात्यावर जमा झाले नसल्याने जवळपास दोन तासांवर कालावधी पोहचला असल्याची तक्रार एका तक्रारदाराने शाखेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी समीर राजपूत यांच्याकडे केली असता तातडीने पैसे खात्यावर जमा झाले होते. मात्र त्यानंतरही प्रकार थांबला नसून २१ ऑगस्ट रोजी भरलेल्या पैशांच्या बाबतीत कॅशियर रिकामे यांनी पैसे जमा होणे एक तास लागेल असे सांगितले होते.
बँकेत कोणती गर्दी अथवा कोणतेही सर्व र डाऊन असताना शाखाप्रमुखांची उत्तरे बँकेचे कर्मचारी देत असल्यामुळे नागरिकांना मात्र बँकेत पैसे भरून पैसे खात्यावर जमा होण्यासाठी वाट पाहावी लागत आहे या प्रकारांना नागरिक त्रस्त झाले आहेत. बँकेच्या दिरंगाईच्या कारभाराचा फटका यापूर्वी देखील नागरिकांना बसला होता त्यावेळेस चेक वटवण्यास आठ दिवसांचा कालावधी लागत असल्याचा प्रकार दैनिक प्रभात ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शाखाप्रमुखांची बदली करण्यात आली होती.
या प्रकाराबाबत शाखाप्रमुखांनी दिलगिरी व्यक्त करीत बँकेकडून चांगले कामकाज करण्यात येईल असे आश्वासन नागरिकांना दिले आहे. मात्र या बँकेच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली जात आहे.





