fbpx

पुणे जिल्हा: शिक्रापुरात वेश्‍या व्यवसायावर छापा

लॉज चालकांसह चार जणांवर गुन्हे

शिक्रापूर -येथे पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भर चौकातील दोन लॉजवर दौंड उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. यामध्ये तीन महिलांची सुटका करून लॉज मालकांसह चौघांवर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबत पोलीस नाईक सुभाष बलभीम डोईफोडे (रा. दौंड ता. दौंड) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी रॉयल लॉजचे मालक अब्बूबकार सिराज काझी (रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरूर), कैलास त्रिंबक जाधव (रा. चाकण चौक, शिक्रापूर ता. शिरूर), संजीवनी लॉजचे मालक सारंग सुभाष तोडकर, हनीफ बालाभाई मुलाणी (दोघे रा. शिक्रापूर ता. शिरूर) यांच्याविरुद्ध वेश्‍याव्यवसाय प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.

पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर बेदरे, पोलीस नाईक सुभाष डोईफोडे रॉयल लॉजवर गेले. तेथे बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला. त्या ठिकाणी दोन महिलांना ताब्यात घेत चौकशी केली असता रॉयल लॉजमधील कैलास जाधव व लॉजचे मालक अब्बूबकार काझी त्यांच्याकडून वेश्‍याव्यवसाय करून घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांनतर शेजारील संजीवनी लॉजमध्ये छापा टाकत एका महिलेला ताब्यात घेत चौकशी केली असता संजीवनी लॉजमधील हनीफ मुलाणी व लॉजचे मालक सारंग तोडकर हे त्यांच्याकडून वेश्‍याव्यवसाय करून घेत असल्याचे तेथील महिलेने सांगितले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.