शिरूर : शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार, आमदार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची वडगाव रासाई (दि.१४) दुपारी १ वाजता जाहीर सभा होत आहे. दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा कार्यक्षेत्रात महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ शरद पवार हे सभा घेत आहेत. त्यामुळे निवडणुकीची हवा चांगलीच तापली आहे.
शरद पवार यांच्या या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वडगाव रासाई येथील शरद पवार यांची सभा राजकारणातील सूचक संकेत देणारी ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशोक पवार यांनी विकासकामांच्या माध्यमातून शिरूर हवेलीचा मोठा विकास केला आहे.
गावोगावी प्रचार यंत्रणा राबवून ते मतदारांपर्यंत पोहचले आहे. आता वडगाव रासाई येथे शरद पवार हे अशोक पवार यांच्या गावी प्रचारासाठी येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले असून ही सभा निर्णायक ठरणार आहे.