वाघोली : राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्ताने वाहतूक पोलिसांच्या वतीने वाघोली येथे जनजागृती कार्यक्रम आयोजीत करून नागरिकांना वाहतुक नियम व सुरक्षा या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या.
शाळकरी मुलांनी वाहतूक नियम जनजागृतीमध्ये सहभाग घेतला. वाघोली वाहतुक विभागातर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त केसनंद फाटा येथे कार्यक्रम घेण्यात आले. शाळा, कॅालेजचे विद्यार्थी व नागरिकांना वाहतूक नियम व सुरक्षेच्या अनुषंगाने सर्व सूचना दिल्या गेल्या.
वाहतूक पोलिसांनी केसनंद फाटा चौकामध्ये नियमांचे पालन करणार्या नागरिकांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले तसेच नियम भंग करणार्या नागरिकांना नियमाचे पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.