चिंबळी -मरकळ (ता. खेड) परिसरात करोनाबाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच करोना योद्ध्यांनाही आता करोनाची लागण होत आहे. त्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून कुरूळी-मरकळ जिल्हा परिषद गटातील आरोग्य केंद्रांना मास्क, पीपीई किट, हॅन्डग्लोज, “सी’, “डी’ व्हिटॅमिनच्या गोळ्या सुपूर्द करण्यात आल्या.
जिल्हा परिषद सदस्या दिपाली काळे यांच्या निधीतून मरकळ, सोळू, केळगाव, चऱ्होली खुर्द, भोसे, रासे, वडगाव, शेलगाव येथील उपकेंद्रांतील अधिकाऱ्यांना शेलपिंपळगाव आरोग्य केंद्रात बोलवून या वस्तू सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या दिपाली काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखी, मोहिनी साखरे, भाग्यश्री पाटील, प्रिती राडोठ, अर्चना घोडके, सोनाली लोंढे, वर्षा ताजणे, ग्रामविकास अधिकारी एम. व्ही. मागाडे आदी मान्यवर उपस्थित होते.