बारामती (प्रतिनिधी) – बारामती शहर व तालुक्यात आज नव्याने 51 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले असल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे.
जनता कर्फ्यू हटवल्यानंतर बारामतीतील रुग्ण संख्या वाडीचे जे अंदाज बांधण्यात येत होते त्यापद्धतीने रुग्णसंख्या वाढताना दिसून येत नाही हे बारामतीकरांसाठी दिलासादायक आहे.
काल दिवसभरात बारामती शहरात 27 तर ग्रामीण भागात 24 रुग्ण आढळून आले. बारामतीतील एकूण रुग्ण संख्या 3 हजार 71 एवढी झाली असून 2 हजार 161 रुग्ण आत्तापर्यंत बरे झाले आहेत .आत्तापर्यंत 74 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.