वाघोली : हवेली तालुका भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने शिरूर हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांची प्रकृती सुधारावी यासाठी केसनंद तालुका हवेली येथील शंकराच्या मंदिरात आरती करून प्रार्थना करण्यात आली.
शिरूर हवेली तालुक्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी माजी आमदार बाबुराव पाचरणे यांनी मोलाची कामगिरी केली आहे. लोकनेता म्हणून त्यांची ओळख तालुक्यात आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस गणेश कुटे, रोहिदास उंद्रे, दादा सातव, विकास जगताप, हवेली तालुका भाजपचे अध्यक्ष संदीप भोंडवे, पुणे जिल्हा युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी, पंचायत समितीचे माजी सदस्य श्याम गावडे, माजी सरपंच नितीन गावडे, दिनेश झांबरे, सचिन जाधव, शिवाजी गोते, अनिल सातव, केतन जाधव,माजी सरपंच स्वप्निल उंद्रे,विजय जाचक, गणेश चौधरी,प्रदीप सातव,अजिंक्य कांचन,पूनम चौधरी,सुप्रिया गोते,उमेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.