पुणे जिल्हा: “पीएम किसान’च्या साडेचार लाखांवर डल्ला

जुन्नरमधील अपात्र लाभार्थ्यांकडून वसूल केलेली रक्‍कम चोरीला

जुन्नर – पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडून वसूल केलेल्या 4 लाख 62 हजार रुपये रोख, 12 हजार रुपयांचे धनादेश असलेल्या रकमेचा भरणा जुन्नर येथील स्टेट बॅंक ऑफ इंडिया येथे जमा करण्यासाठी नेला असताना ते लंपास केले आहेत. जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

बोरी बुद्रुक येथील कोतवाल जावेद मणीयार यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून रक्‍कम वसूल करून तिचा भरणा बॅंकेत करण्याचे काम तालुक्‍यात सुरू आहे. गुरुवारी (दि. 12) मंडल अधिकारी नितीन चौरे, कोतवाल मणीयार व श्री. लोंढे हे वसूल रकमेचा भरणा करण्यासाठी जुन्नर येथील स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या शाखेत गेले होते.

भरणा करण्यावेळी बॅंक अधिकाऱ्याने ही खाते तहसीलदार यांच्य पॅनकार्ड नंबरला जुळत नाही, असे सांगितले. त्यावेळी चौरे हे तहसीलदार कार्यालयात विचारपूस करण्यासाठी गेले होते. यावेळी बॅंकेच्या बाहेर असलेल्या परदेशी यांच्या कार्यालयाच्या बाकड्यावर बॅंकेच्या स्लीप भरत असताना बाजुला ठेवलेली पैशाची निळ्या रंगाची कापडी पिशवी चोरीला गेली. ही चोरीला गेल्यामुळे जुन्नरमध्ये खळबळ उडाली असून अनेक तर्कवितर्क सुरू आहेत.

माहिती मिळताच आम्ही त्वरित तिथे गेलो. नाकाबंदी केली तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासले, पण त्यात काहीही मिळून आलेले नाही. याप्रकरणी संबंधीत कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा झाला आहे.
-युवराज मोहिते, पोलीस निरीक्षक, जुन्नर पोलीस ठाणे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.