पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता व महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य, प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ.संजीव सोनवणे यांचे वडील कै.श्री.अर्जुनराव जबाजी सोनवणे (भाऊसाहेब) यांचे दि. 20 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी वृद्धापकाळाने वयाच्या 82 व्या वर्षी राहत्या घरी दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाने सोनवणे परिवाराची मोठी हानी झाली आहे. कै. श्री.अर्जुनराव जबाजी सोनवणे (भाऊसाहेब) यांचा दशक्रिया रविवार दि.28 नोव्हेंबर 2021 रोजी निमगाव वाघा – बाराखोंगळ ता.नगर येथे सकाळी 9 वा. सत्यशोधक पद्धतीने होणार आहे. त्याच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुले , सुना व नातवंडे असा परिवार आहे.