चिंबळी -केळगाव (ता. खेड) येथे दिपावली सणानिमित्त “ऑनलाइन दिपावली महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संघर्ष युवा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व माजी उपसरपंच अमोल विरकर यांनी दिली. शनिवार (दि. 14) ते शुक्रवार (दि. 20) या कालावधीत हा महोत्सव आयोजित केला आहे.
यात रांगोळी, निबंध, किल्ले स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यास प्रशस्ती पत्रक, स्मृतीचिन्ह रोख स्वरूपात बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धा हनुमानवाडी वासीयांसाठी (केळगाव) ठेवण्यात आल्या असल्याचे वीरकर यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे चिंबळी येथेही शनिवारी (दि. 14) अखिल चिंबळी युवा वर्गाच्यावतीने ऑनलाइन रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. माजगाव, चिंबळी गावातील ग्रामस्थांनाच या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.