पुणे जिल्हा: शिरूरमध्ये कांद्यास क्विंटलला 3025 रुपये भाव

शिरूर -सगळीकडे कांद्याचे बाजारभाव पडलेले असताना शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे लिलावात सरासरी 2000, 2500 ते 3025 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

या लिलावाच्या वेळी स्वतः सभापती शंकर जांभळकर, संचालक बंडु जाधव, प्रवीण चोरडिया, विजय गद्रे, सचिव अनिल ढोकले लक्ष ठेवून होते. शिरूर बाजार समितीचया नवीन मार्केटयार्डवर भरत असणाऱ्या कांदा मार्केट मध्ये कांद्याची दररोज मोठी आवक होत आहे. आठवड्याचे दर बुधवार, शुक्रवार व रविवारी कांद्याची जाहीर लिलावाने विक्री होत असते.

शुक्रवारी (दि. 18) सुमारे 5640 पिशव्याची आवक झाली. होत आहे. बाजार समितीने यार्डवर शेतकऱ्यांचा कांदा उतरविणेसाठी शेड, लाईट, स्वच्छतागृह, सी. सी. टी. व्ही. इत्यादी आवश्‍यक त्या पायाभुत सुविधा उभारलेल्या आहेत. पुणे व शेजारील अहमदनगर, नाशिक जिल्ह्यामध्ये गरवा जातीचा डबल पत्ती असणाऱ्या कांद्याची लागवड केली जाते. हा कांदा टिकाऊ व चांगली मागणी असते.

यार्डवरील कांदा कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, तामीळनाडु, पश्‍चिम बंगाल, झारखंड, आसाम या राज्यामध्ये विक्रीसाठी जात असतो. यार्डवर कांदा विक्रीचे दर हे शेजारील मार्केटपेक्षा जास्तच निघत असल्याचे सचिव अनिल ढोकले यांनी सांगीतले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.