पुणे जिल्हा: सणसवाडीत एकाची कंटेनरखाली आत्महत्या

आजाराला कंटाळून जीवनयात्रा संपविली

शिक्रापूर -सणसवाडी (ता. शिरूर) येथे एका 50 वर्षीय व्यक्‍तीने आजाराला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी खिशामध्ये ठेवून कंटेनरखाली उडी मारून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. 19) दुपारच्या सुमारास घडली असून शिक्रापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

शिवाजी धनशाम कांबळे (वय 50, रा. वाडागाव, कोरेगाव भीमा, ता. शिरूर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. तर कंटेनर चालक सागर उद्धव गायकवाड (रा. तळवडे ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.

सणसवाडी येथील प्राज कंपनी येथे चालक सागर गायकवाड हा कंटेनर (एमएच 14 बीजे 0541) घेऊन चालला असताना कंपनीकडे वळल्यानंतर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एका व्यक्‍तीने कंटेनरच्या चाकाखाली उडी मारल्याने तो कंटेनरखाली चिरडला गेला, मात्र त्याठिकाणी लोकांची गर्दी होऊ लागल्याने चालक गायकवाड यांनी थेट पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. 

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अपघातग्रस्त व्यक्‍तीला वाघोली येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले असल्याचे समजले; मात्र त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्या व्यक्‍तीच्या खिशामध्ये एक चिठ्ठी मिळून आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जितेंद्र पानसरे हे करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.