आळंदी – शेतात गवत कापण्यासाठी जात असलेल्या महिलेचे कारमधून अपहरण केले. तसेच तिला धुळे येथे नेऊन तिला व तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार 31 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2020 या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
बाबुराव नामदेव कोळपे (वय 30, रा. कोयाळी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पीडित महिलेने गुरुवारी (दि. 26) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादी महिला 31 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता शेतामध्ये गवत कापण्यासाठी जात होती. त्यावेळी आरोपीने तिला कारमध्ये जबरदस्तीने बसवून धुळे, शिरपूर येथे नेले. तिथे महिलेच्या इच्छेविरोधात तिच्यावर बलात्कार केला.
फिर्यादी महिला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने हे कृत्य केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला गुन्हा दाखल होताच तात्काळ अटक केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.