राजगुरूनगर : अधिकारी आणि नागरिक यांचा एकमेकांवर विश्वास असला पाहिजे, प्रश्न समस्या सोडणार मात्र थोडा वेळ देणे आवश्यक आहे. तुम्ही विश्वास ठेवा, आम्ही विश्वासाने काम करू, असा विश्वास खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या निमिताने नागरिकांना दिला.
खेड पंचायत समितीच्या राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात तालुकास्तरीय लोकशाही दिन झाला यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना तहसीलदार देवरे बोलत होत्या. या लोकशाहीदिनासाठी गटविकास अधिकारी विशाल शिंदे, चाकणचे पोलीस निरीक्षक नाथा घार्गे, खेडच्या सहायक निरीक्षक स्नेहल राजे, सहायक सहकारी दुय्यम निबंधक सचिन सरसमकर, निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड, नायब तहसीलदार राम बीजे, नायब तहसीलदार रवींद्र मोरेकृषी अधिकारी नंदू वाणी, पशुवैद्यकीय अधिकारी योगेश शेळके, महिला बाल विकास अधिकारी अनिकेत पालकर, दुय्यम निबंधक वंदना पोळ, सुनील परदेशी, महाळुंगे इंगळेचे पोलीस उपनिरीक्षक पोपट काळे, महावितरणचे उपअभियंता उत्तम मंचरे, नितीन परदेशी, सुनील कोळी, राहुल लामखेडे यांच्यासह बांधकाम, वन विभाग, चाकण, आळंदी नगरपरिषद अधिकारी, तालुक्यातील विविध प्रश्न घेऊन आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर गणेश सांडभोर, प्रकाश पाचारणे, प्रशांत नगरकर, राजेंद्र सुतार, सतीश चांभारे, सिद्धेश कर्नावट,आळंदीचे दत्तात्रय साबळे, अमित टाकळकर, भिकाजी गाढवे, यशवंत पवळे, रमेश बोडसे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. सर्वाधिक समस्या, प्रश्न राजगुरूनगर परिषद हद्दीतील होत्या. हे प्रश्न सोडवण्यासाठी नगरपरिषदेने तात्काळ कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश तहसीलदार देवरे यांनी संबंधित अधिकार्यांना दिले.
या प्रश्नांचा भडिमार
वाहतूक समस्या, शेतकर्यांकडू बाजारात जास्त दराच्या आणि दोन दोन पावत्या देत पिकळवणूक करणे, आळंदी हद्दीत लहान वारकरी मुलांवरील अत्याचार, तालुक्यातील गुन्हेगारी, वाहतूक प्रश्न, शौचालय प्रश्न,आरोग्याबाबत समस्या राजगुरुनगर नगरपरिषदेच्या हद्दीतील रस्ते, वाहतूक बेशिस्त पार्किंग, अनधिकृत बांधकामे, आरोग्य, स्वच्छता प्रश्न उपस्थित केले. संबंधित अधिकार्यांनी याबाबत उत्तरे दिली.
त्या अधिकार्यांना कारणे दाखवा
जे अधिकारी लोकशाही दिनाला उपस्थित नाहीत त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश देण्यात आले. तर लोकशाही दिनाला उशिरा आलेल्या अधिकार्यांना तहसीलदार देवरे यांनी समज दिली. पुढील लोकशाही दिन भीमाशंकर येथे होणार असून तालुक्यात इतरही गावांमध्ये लोकशाही दिन कार्यक्रम घेतला जाईल सामाजिक शांतता बिघडवणार्या व्यक्तीवर कारवाई करण्याचा अधिकार आहे त्याची अंमलबजावणी केली जाईल. असेही तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले