पुणे जिल्हा: ओढ्यातून वाहून गेलेला मृतदेह सापडेना

राजेगाव -राजेगाव येथील ओढ्यात रात्रीच्या वेळेस पाण्याचा अंदाज न आल्याने दोन मोटारसायकली चार जणांसह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. सर्व मृत हे खानवटे येथील होते. तीन मृतदेह सापडले आहेत.

त्यांच्यावर अंत्यविधी केला आहे. यातील सुभाष लोंढे (वय 42) यांचा शोध सुरू आहे. लोंढे यांचा मृतदेह अड्डेचाळीस तास शोधून सापडत नाही. त्यानंतर महसूल यंत्रणेने आपत्तकालीन व्यवस्थापन पथक पुणे यांना पाचारण केले आहे.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार राहुल कुल यांनी मृतांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. शासकीय आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.