विविध सर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण
राजगुरूनगर – राजगुरूनगर नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2024 माझी वसुंधरा अभियान हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्याचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले.
राजगुरूनगर नगरपरिषदेच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण 2024 व माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत स्वच्छ राजगुरुनगर फेस्टिवल गेल्या एक महिन्यापासून प्रत्येक वॉर्डात स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी होम मिनिस्टर, सायकल रॅली, चित्रकला, मॅरेथॉन, मिस वसुंधरा आदी स्पर्धांचे राजगुरूनगर नगरपरिषदेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा शहरात गेल्या एक महिन्याभरात घेण्यात आल्या. त्या स्पर्धेमध्ये महिलांचा व विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेतला. होम मिनिस्टर स्पर्धा प्रत्येक वॉर्डमध्ये घेण्यात आले त्या अंतर्गत 50 महिलांनी प्रथम क्रमांक पैठणी, द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांकसाठी स्वच्छतेचा मॉप 150 बक्षीस ठेवण्यात आली होती.
शालेय स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय, हुतात्मा राजगुरू विद्यालय, केटीईएस विद्यालय, जिल्हा परिषद शाळा, जिल्हा परिषद उर्दू शाळा आदी शाळांनी सहभाग घेतला या स्पर्धा लहान गट मध्यम गट व मोठा गट अशा तीन गटात घेण्यात आल्या. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास नगरपरिषद तर्फे प्रशस्तीपत्रक देण्यात आले हा फेस्टिवल मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
या स्पर्धाचे बक्षीस वितरण मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगरसेवक सुरेखा क्षोत्रीय, संगणक अभियंता प्रतीक्षा निकुंभ, नगरपरिषद आरोग्य विभाग प्रमुख साधना शिंदे, नितीन गवळी, राजेंद्र बारणे, शहर समन्वयक प्रतिकेश सातकर, महात्मा गांधी विद्यालयाचे नितीन वरकड, केटीएमच्या मुख्याध्यापिका अनिता गुजराथी यांच्यासह मोठ्या संख्येने शाळांचे विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
स्पर्धेतील गटनिहाय विजते
चित्रकला – केटीईस शाळा (लहान गट) : वरद पिसे, शिवली पवार, वैष्णवी पाडळे, (मोठा गट) : सार्थक घनवट, अदिती टोके, आनंदी गायकवाड, (खुला गट) : सिद्धी गुंडाळ, वराड वामन, सिद्धेश गुंडाळ. महात्मा गांधी विद्यालय : (मोठा गट) : निरव मुंढे, आराध्या कराळे, श्रेया वेहेळे. हुतात्मा राजगुरू विद्यालय : (मोठा गट) : सुप्रिया वाकोडे, सोनाक्षी जढर, तनया अगरकर, (खुला गट) : मयूर रुके, अपूर्व कोंडविलकर, अक्षरा शिंदे. जिल्हा परिषद उर्दू शाळा : (लहान गट) : हमद आतार, नफिस खान, हलिया अन्सारी, (मोठा गट) : मारिया आतार, नौशाद खान, राहत अन्सारी. मुलींची शाळा क्र 1 : (मोठा गट) : यश बोर्हाडे, रुद्र गोईरत, अमितकुमार शहा. मुलींची शाळा क्र 2 : (मोठा गट) : तेजस्वीनी देशमुख, अनुष्का निर्मळ, राणी राक्षे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजगुरूनगर : (लहान गट) : हर्ष शहा. वेस्ट टू बेस्ट निकाल : (लहान गट) : श्रावणी कोहिनकर, सारा अन्सारी, वेदिका ढोरे. (मोठा गट) : चिराग कोठारी, अदिती वाडेकर, रबिना अन्सारी. (खुला गट): सिद्धी गुंडाळ, विघ्नेश राक्षे, क्रिष्णा गिरी.