सागर सातकर : महायुतीचे उमेदवार दिलीप मोहितेंचा घर टू घर प्रचार
राजगुरूनगर – ऑन ड्यूटी 24 तास काम करणारे राज्यातील एकमेव आमदार दिलीप मोहिते पाटील असून त्यांना जनता पुन्हा आमदार करणार असून ते विधीमंडळात मंत्री होतील, असा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेस राजगुरूनगर शहर अध्यक्ष सागर सातकर यांनी व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार (राष्ट्रवादी काँग्रेस) तथा आमदार राजगुरूनगर शहरात सोमवारी (दि. 11) घर टू घर प्रचार करण्यात आला. या प्रचारात शहरातील कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.यावेळी युवा नेते वैभव घुमटकर, राष्ट्रवादी काँग्रेस राजगुरूनगर शहर अध्यक्ष सुभाष होले, युवक अध्यक्ष सागर सातकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर अध्यक्ष पप्पू बनसोडे, संतोष भांगे, अमित घुमटकर, स्वप्निल माठे, मनोज थिगळे, दीपक थिगळे, वैभव नाईकरे, ज्ञानेश्वर बोंबले,
रोहित घुमटकर. नितीन ताठे, विकास वाळुंज, अर्चना मोहिते पाटील, कल्पना सांडभोर, अपर्णा होले, मनीषा टाकळकर, मीनाक्षी भांगे, भारती पाटोळे, दीप्ती कुलकर्णी, माया गोगावले, अश्विनी शिंदे, सीमा रिठे, संतोष शिंदे, संकेत गवळी, प्रतीक दुधवडे, सागर जाधव आदी महिलांसह युवक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
राजगुरूनगर शहरातील राहुल चौक, पांडुरंग नगर, थिगळस्थळ, पडाळवाडी, जुना मोटार स्टॅन्ड आदी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार मोहिते पाटील यांचा घर टू घर प्रचार केला.
नागरिकांनी त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. काम करणारा नेता हवा आश्वासन देणारा नको, निधी आणणारा नेता हवा, ठेकेदारी करणारा नको, असा नागरिकांचा सूर होता. खेड तालुक्याला मंत्रिपदाची संधी आल्याने आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मागे आम्ही ठामपणे उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली.