जुन्नर : जुन्नर विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार (राष्ट्रवादी) तथा विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी बुधवारी (दि.13) जुन्नर शहरात प्रचार रॅली काढून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले. प्रचार रॅलीत मोठ्या संख्येने तरुण, सुज्ञ व जाणकार, वयोवृद्ध, महिला, व्यापारी, कष्टकरी सहभागी झाले होते. अतुल बेनके यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
प्रचार रॅलीत पापाशेठ खोत, अंबरशेठ परदेशी, उज्ज्वला शेवाळेज आनंद परदेशी, भाऊ कुंभार, दीपक परदेशी, नरेंद्र कासार, सुहास चिखले, महेश काजळे, धनेश संचेती, राहुल परदेशी, जितू बिडवई, अनिल पुरवण, सुमित परदेशी, निलेश शिंदे, मयूर महाबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार बेनके म्हणाले की, महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व आपल्याला पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक पार पडेपर्यंत सजग राहणे आवश्यक आहे. निवडणूक पार पडेपर्यंत कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात, वॉर्डात, सोसायटीमध्ये घरोघरी जाऊन मतदारांमध्ये आपण केलेल्या विकासकामांची माहिती देऊन मतदारांना जागृक करणे आवश्यक असल्याचे नमूद केले.
आमदार बेनके म्हणाले की, गावोगावी जाऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवले आहे. त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांना आधार देण्याचे काम केले. रस्ते, पाणी, वीज, क्रीडा आदी विकास कामांसह शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, दलित, ठाकर, मुस्लीम, व्यापारी, विद्यार्थी, विद्यार्थिनींचे प्रश्न सोडवण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला असून प्रामाणिकपणे काम केले असल्याचे त्यांनी नमूद केले.
विरोधकांना मतदार भूलणार नाही
जुन्नर विधानसभा निवडणुकीत विरोधी उमेदवार भावनिक प्रचार करीत असून त्यांच्या प्रचाराला जुन्नर तालुक्यातील मतदार कधीही भूलणार नाही याची मला खात्री आहे. निवडणुका आल्या म्हणून तालुक्यात फिरून मला मतदान करा असे सांगत नसून 2019 ला आमदार झाल्यापासून आजपर्यंत मी तालुक्यातील जनतेची प्रामाणिकपणे सेवा केली असल्याचे आमदार बेनके यांनी नमूद केले.