पुणे जिल्हा :आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याची धमकी

निमोणे (वार्ताहर) – शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीचे निनावी पत्र आल्याने शिरूर तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. शिरूर शहरातील अनेक नगरसेवक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोस्टद्वारे हे पत्र आले आहे.

या पत्रात उद्योजक प्रकाश धारिवालांसह नगरसेवक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांबद्दल अपशब्द वापरण्यात आले आहेत.

आमदार अशोक पवार यांचा महेंद्र मल्लाव करण्याची धमकी पत्रात देण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वीच नगरसेवक महेंद्र मल्लाव यांची भरचौकात दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती.

त्यामुळे आमदार अशोक पवार यांनाही भर चौकात जीवे मारण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आल्याने याचे तालुक्‍यातील राजकारणात तीव्र पडसाद उमटले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.