आज सर्व संतांच्या पालख्या पंढरीत दाखल होणार
पंढरपूर – माउलीचे पालखी सोहळ्यातील चौथे आणि शेवटचे गोल रिंगण आणि उभे रिंगण बाजीराव विहिरीजवळ झाले. तर दुसरीकडे तुकोबारायांच्या पालखीचे बाजीराव विहिरीजवळ उभे रिंगण उत्साहात पार पडले. आज म्हणजे शनिवारी सर्व संतांच्या पालख्या पंढरीत दाखल होणार आहेत.
ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळा भंडीशेगाव येथील मुक्काम आटोपून पुढे मार्गस्थ झाला. वाखरी जवळील बाजीराव विहिरीजवळ माउलीच्या पालखी सोहळ्यातील शेवटचे गोल रिंगण सोहळा पार पडला. यानंतर माऊलीचा पालखी सोहळा वाखरी येथे मुक्कामासाठी पोहचला.
तर दुसरीकडे माऊलींच्या पालखीचा रिंगण सोहळा पार पडल्यानंतर तुकाराम महाराजाच्या पालखी सोहळ्यातील उभं रिंगण बाजीराव विहीर येथे पार पडले. यानंतर तुकोबारायची पालखी वाखरी मुक्कामी पोहचली. वाखरी येथे पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे, आरोग्य सुविधा, स्वच्छता, सुरक्षा तसेच विद्युत पुरवठा आदी आवश्यक सुविधा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.