– १०० हून अधिक गावातील प्रवाशांची सोय होणार
मंचर – मंचर एसटी आगारातून मंचर-संभाजीनगर एसटी बस सुरू झाल्याने आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील १०० हून अधिक गावातील प्रवाशांची सोय झाली आहे.
मंचर एसटी आगारातून मंचर-संभाजीनगर एसटी बस मंचर बस स्थानक येथून सकाळी ६ वाजता सुटणार आहे.
नारायणगाव,आळेफाटा,नगर मार्गे संभाजीनगर येथे दुपारी १२.३० वाजता पोहचणार आहे. संभाजीनगर एसटी बस स्थानकातून दुपारी १ वाजता एसटी बस मंचरला मार्गस्थ होण्यासाठी निघणार आहे.
एसटी बसचे उदघाटन आगार व्यवस्थापक बालाजी सूर्यवंशी याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र गेगजे, सचिव मोहंमद सलील सय्यद, वाहतूक नियंत्रक पुरुषोत्तम वायकर यांच्या सह एसटीचे चालक-वाहक उपस्थित होते.