सोहम थोरात, सोहम घुले, ऋतिका थोरात, वेदश्री थोरात प्रथम
मंचर – लौकी (ता. आंबेगाव) येथे समस्त ग्रामस्थ व नवतरुण मंडळाच्या वतीने दीपावलीनिमित्त शालेय विद्यार्थ्यासाठी आयोजित ऐतिहासिक किल्ले बनवा स्पर्धेत सोहम दत्तात्रय थोरात व सोहम स्वप्नील घुले तर रांगोळी रेखाटन स्पर्धेत महिलांमध्ये ऋतिका रमेश थोरात व वेदश्री भूषण थोरात यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
हनुमान मंदिराच्या प्रांगणात विजेत्या स्पर्धकांना अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला पुणे जिल्हा समिती ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे गुरुजी, माजी सरपंच अलका पडवळ, ग्रामपंचायत सदस्या पूजा थोरात, जालिंदर थोरात व पोलीस पाटील अर्जुन ठोंबरे, फौजी सुरेश थोरात, उद्योजक निलेश थोरात यांच्या हस्ते रोख रक्कम व श्यामची आई पुस्तक देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शहीद जवान मेजर सुधीर थोरात यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी आदर्श शिक्षक विकास कानडे, संतोष कानडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथ थोरात,
उपाध्यक्षा तेजस्वीनी पडवळ, सदस्य केतन काळे, संजय थोरात, मंगेश थोरात, स्वप्नील थोरात, प्रवीण पडवळ, रुपेश थोरात, सुनिल पडवळ, सुरेखा काळे व शालेय विद्यार्थी उपस्थित होते. लौकी परिसरातील पंचेचाळीसहून अधिक स्पर्धकांनी किल्ले बनवा स्पर्धेत रायगड, प्रतापगड, शिवनेरी, जंजिरा, राजगड, मल्हारगड आदी किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती तसेच रांगोळी रेखाटन स्पर्धेत स्त्री सन्मान, शेतकरी आत्महत्या, उद्योजक रतन टाटा, मोबाईलचे दुष्परिणाम, महिलांवर होणारे अत्याचार, संतवारी संबंधी रांगोळीतून आपले विचार व्यक्त केले.
स्पर्धेचे नियोजन शिक्षक संतोष थोरात, श्रीकांत थोरात, विजय थोरात, ओंकार थोरात, रोहित काळे, विशाल थोरात, राहुल थोरात, सचिन थोरात, केतन थोरात, विक्रांत थोरात, अक्षय थोरात यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष निलेश थोरात आणि आभार एस. टी. पार्सल ट्रान्सपोर्ट सर्विसचे रविंद्र थोरात यांनी मानले.
यशस्वी स्पर्धक
रांगोळी स्पर्धा-प्रथम क्रमांक ऋतिका थोरात, वेदश्री थोरात, द्वितीय क्रमांक अंकिता काळे, निलम तरटे, तृतीय क्रमांक मयुरी पोखरकर, अवंतिका बोर्हाडे व तन्वी थोरात तसेच किल्ले बनवा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सोहम थोरात व सोहम घुले, द्वितीय क्रमांक अथर्व थिटे, विवेक थोरात, तृतीय क्रमांक स्वराज थोरात, अर्णवी थोरात, सर्वेश थोरात.