हडपसर – नगरसेवक मारुतीआबा तुपे यांचा वाढदिवस व माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त हडपसर ससाणे नगर येथे पुणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान, नगरसेवक मारुती आबा तुपे युवा प्रतिष्ठान, धर्मवीर शंभूराजे फिटनेसचे दीपक तांदळे, राहुल तुपे ,ओंकार तुपे व बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन पुणे अजय गोळे यांनी केले होते.
प्रमुख पाहुणे डॉ. संजय मोरे, शरद मारणे उपस्थित होते.आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर मल्लेश धनगर व स्नेहा प्रकाश यांचाही सन्मान करण्यात आला. स्पर्धेला परिक्षक म्हणून अजय गोळे, मंगेश परदेशी, इलियास शेख, विवेक माने, श्रीराम बराटे , संग्राम पवार यांनी काम पाहिले. स्पर्धेमध्ये 250 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. हडपसर श्री 2021 या किताबाचा मानकरी अभिजीत पराते ठरला .धर्मवीर शंभूराजे मेन्स फिजिक्स श्री 2021 चा मानकरी – अथर्व थोपटे. जिजाऊ वुमन क्लासिक श्री 2021 ची मानकरी -पूजा गौडा, बेस्ट पोझर- विशाल सुरवसे’ ,अपकमिंग बॉडी बिल्डर- अविष्कार सोलापूरकर ,वूमन कॅटेगरीमध्ये वूमन बेस्ट पोझर- प्रिया इल्ले मानकरी ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक तांदळे, किरण जाधव, सतीश भिसे यांनी केले.
हडपसर : हडपसरमध्ये पुणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात नगरसेवक मारुती आबा तुपे यांच्या वतीने आयोजन.