बेल्हे -जाधववाडी (ता. जुन्नर) हद्दीवरील एका पोल्ट्री फार्मच्या शेडचा सिंमेट पत्रा फोडून बिबट्याने हल्ला करून 200 कोंबड्यांचा फडशा पाडला. तर अनेक पक्षी जखमी झाले आहेत. या घटेत पोल्ट्री फार्मचालक योगिता गुंजाळ यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या परिसरात दोन दिवसांपासून मादी बिबट्या आणि बछडा फिरत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनात आले होते. बेल्हे, राजुरी, बोरी, आळे, वडगाव कांदळी, अणे पठार, निमगाव सावा याभागात बिबट्याचे हल्ले वारंवार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे.