वाघोली : पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध असणाऱ्या श्रीक्षेत्र वाडेबोल्हाई ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी कीर्ती अमोल पायगुडे यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांच्यावर निवडीबद्दल अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
सरपंच वैशाली चंद्रकांत केसवड यांच्या उपस्थितीत उपसरपंच पदाच्या निवडणुकीत कीर्ती अमोल पायगुडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध घोषित करण्यात आले. वडगाव शेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप यांच्या शुभहस्ते कीर्ती अमोल पायगुडे यांना सन्मानित करण्यात आले.
वाडेबोल्हाई ग्रामस्थांच्या वतीने ज्येष्ठ नेते माजी उपसरपंच संजय भोरडे यांच्या हस्ते कीर्ती अमोल पायगुडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामपंचायतचे आजी-माजी पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी कार्य करणार असल्याचे उपसरपंच कीर्ती पायगुडे यांनी सांगितले. सर्वसामान्य कुटुंबातील एक महिला उपसरपंच पदी विराजमान झाल्याने पायगुडे यांच्यावर पंचक्रोशीतून अभिनंदनच वर्षाव होत आहे.