पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची उपविभागीय पोलीस अधिकार्यांना निवेदन
डोर्लेवाडी – बारामती तालुक्यातील पत्रकार नवनाथ बोरकर आणि त्यांच्या वयोवृद्ध आई- वडिलांवर सोमवारी (दि. 1) गावातील नागरिकांनी कट रचून आणि जमाव करून जिवघेणा हल्ला केला आहे. यात आई वडिल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
पत्रकार आणि त्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याने बारामतीतील पत्रकार संघटना आक्रमक झाली आहे. पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल व्हावा यासाठी बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांना व उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांना निवेदन दिले असून पोलिसांनी वेळीच योग्य न्याय न दिल्यास पत्रकार संघटना आंदोलनाचा पावित्रा घेणार आहे.
या संदर्भाने बारामतीतील पत्रकार संघ, ऑल इंडिया संपादक संघ, भारतीय पत्रकार संघ यांच्यावतीने बारामती विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांना आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्या बाबतचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी पत्रकार सोमनाथ कवडे, तैनुर शेख, नवनाथ बोरकर, स्वप्नील कांबळे, वसंत मोरे, दीपक पडकर, विकास कोकरे, प्रशांत तुपे, स्वप्नील शिंदे, योगेश नालंदे, सागर सस्ते, संताराम घुमटकर, आदी पत्रकार उपस्थित होते.
होणार्या घटनेची माहिती पत्रकार नवनाथ बोरकर यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना दिली होती; मात्र या अधिकारी यांनी 112 वर फोन करण्याच्या सूचना बोरकर यांना दिल्या होत्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर पुढची घटना घडलीच नसती असे बोरकर यांनी सांगितले.
निपक्षपणे तपास केला जाईल
निपक्षपणे तपास केला जाईल तसेच या प्रकरणात पत्रकार नवनाथ बोरकर यांना योग्य सहकार्य करण्याचे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी निवेदन देण्यासाठी आलेल्या पत्रकार संघटनेच्या पदाधिकार्यांना आश्वासन दिले.