fbpx

पुणे जिल्हा: जेजुरी गड रोषणाईने उजळला

100 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मर्दानी दसरा रद्द

जेजुरी -भारतीय लोकदैवत आणि अवघ्या महाराष्ट्राचा कुलस्वामी असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचा मार्तंड शारदा उत्सव करोनाच्या सावटामुळे साध्या पद्धतीने साजरा होत आहे. मंदिर जरी दर्शना करीता बंद असले तरी जेजुरीगड व मंदिरास विद्युत रोषणाई केल्यामुळे संपूर्ण जयाद्री परिसर झगमगून गेला आहे. 

शासनाचे सर्व नियम पाळून सुरक्षित अंतर राखून मोजक्‍या मानकरी गावकरी खांदेकरी, सेवेकरी आणि देवसंस्थान विश्‍वस्त, कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मार्तंड शारदीय नवरात्र उत्सव अगदी साध्या पद्धतीने सुरू आहे. सामाजिक रुढी, परंपरा आणि सांस्कृतिक उत्सव असलेला आणि विशेष आकर्षक असलेला मर्दानी दसरा मात्र 100 वर्षांच्या इतिहासात प्रथमच रद्द करण्यात आला आहे.

यामुळे शासनचे निर्बंध स्वीकारीत देवसंस्थान अध्यक्ष संदीप जगताप यांनी राज्यातील भाविकांनी जेजुरी गडावर येऊ नये, असे आवाहन केले आहे. तर विश्‍वस्त पंकज निकुडे म्हणाले की, उत्सव काळात जेजुरीतील आणि बाहेरून येणाऱ्या भक्‍तांकरीता महाद्वार प्रवेशद्वारावर डिजिटल स्क्रीन आणि सर्व तंत्रज्ञान प्रसार माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे दर्शनाची सेवा सुरू आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.