मेढा : सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले जावळी तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ, येथील जवान प्रथमेश संजय पवार (वय 22) जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना रात्री साडेअकराच्या सुमारास अतिरेक्यांची चकमक होत असताना हुतात्मा झाले. त्यांचे पार्थिव उद्या रविवारी बामणोली तर्फ कुडाळ गावी येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
प्रथमेश संजय पवार दोन वर्षापूर्वी सैन्य दलात भरती झाले होते . दोन वर्षे बेळगाव येथे सैन्य दलाचे ट्रेनिंग पूर्ण करून सैन्यदलात भरती झाले होते. सीमा सुरक्षा दलात दाखल होण्याचे स्वप्न प्रथमेश पवार यांनी लहानपणापासूनच पाहिले होते .ते स्वप्न वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी पूर्ण केले .अवघ्या तीन महिन्यापूर्वी देशसेवेत समावेश झालेले प्रथमेश संजय पवार हे देशासाठी हुतात्मा झाले.
प्रथमेश पवार यांचे कटुंबीयांचे निकटवर्तीय प्रतापगड साखर कारखान्याचे संचालक प्रदीपशेठ तरडे यांनी सांगितले की 19 मे रात्री साडेअकराच्या प्रथमेश संजय पवार रात्री ड्युटीला जम्मू सांबा ब्लॉक परिसरात नेहमीप्रमाणे जॉईन झाले. अचानक अतिरेक्यांची चकमक सुरू झाली. समोरून अतिरेक्यांची फायरिंग सुरू असतानाच प्रत्युत्तर देतानाच प्रथमेश संजय पवार यांना गोळी लागली. यात ते गंभीर जखमी झाले .उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक खबर जम्मू मधून बामनोली तर्फ कुडाळ येथे त्यांच्या घरी दूरध्वनीवरून सेना दलातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
प्रथमेश पवार लहानपणापासूनच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये यांनी शिक्षण घेतले. प्राथमिक शिक्षण बामणोली तर्फ कुडाळ येथे झाल्यानंतर बारावीपर्यंत पाचवड येथील विद्यालयामध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. जिद्द, चिकाटी, सातत्य व व्यायाम प्रामाणिक प्रयत्नाच्या जोरावर आर्मीमध्ये त्यांचे सिलेक्शन झाले. आर्मी मध्ये भरती होऊन दोन वर्षाचे ट्रेनिंग पुर्ण करून अवघे तीन महिन्यात पूर्ण झाले होते . त्यातच देश सेवा बजावत असताना अतिरेक्यांशी लढत असताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे. जवान शहीद झाले असल्याची माहिती कळताच पूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे .
शांत सुस्वभावी प्रेमळ व आपुलकीच जिव्हाळा असणारा प्रथमेश सर्वांचा लाडका होता . सैन्य दलात दाखल झाल्यावर प्रथम सपुर्ण गावाला महापुजा घालून महाप्रसाद देवून सर्वांचा आर्शिवाद घेणारा धामिक आणि सामाजिक विचाराचा प्रथमेश युवकांचा आयडॉल होता.
प्रदीप तरडे, (बामणोली तर्फ कुडाळ)
“त्या रात्री आई वडील व भाऊ यांच्याबरोबर व्हिडीओ कॉल करून गप्पा मारून चर्चा केली अन तासा दीड तासानं असं घडलेलं समजल हे केवढ दुर्दैव,” असे कुटुबियांनी सांगीतले.
“भूमिहीन असलेल्या कुटुंबातील प्रथमेश पवारांची परिस्थिती अतिशय गरीब व नाजूक. शेतीचा तुकडा नाही . आई वडील मोलमजूरी करून मुलांना शिक्षणाचे धडे दिले . हुतात्मा झालेला प्रथमेश पहिला व दुसरा सातारा येथे अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे.”
हुतात्मा जवान प्रथमेशचे मामा विनोद कदम विमानाने दिल्ली येथे गेले असून तेथून ते जम्मू येथे गेल्यावर शवविच्छेदन नातेवाईकांसमोर होणार आहे. त्यानंतर पार्थिव तेथून उद्या रविवारपर्यंत बामणोली येथे येईल असे या कटुंबाचे निकटवर्तीय प्रदीपशेठ तरडे यांनी सांगितले .