पौड – करोनाच्या महाभयंकर महामारीनंतर वारकरी आनंदात वारीला जाण्यासाठी निघाले आहेत. दोन वर्षांपासून ज्या आनंदाला मुकावे लागले होते त्याचा आस्वाद घेण्याची वेळ आल्याने जाता पंढरीसी सुख वाटे जीवा….या प्रमाणे आपली सर्व हातातली कामे मागे सोडून पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी निघाले आहेत.
विठ्ठल नामाच्या गजरात मुळशी तालुक्यातील 96 नंबर दिंडीचे भालगुडी येथील स्वयंभू नारायण मंदिर येथून शनिवारी (दि. 18) वारीसाठी आळंदीकडे प्रस्थान ठेवले.
रवविारच्या घोटावडे मुक्कामानंरत सोमवारी देहू, तर मंगळवारी आळंदीत पालखी मुक्कामी असणार आहे. यापुढील प्रवास माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरच्या दिशेने करणार आहे.