बाजार समितीत दहा किलोसाठी मिळाला 535 रुपये दर
मंचर – मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मंगळवारी (दि. ३) उच्चांकी बाजारभाव मिळाला. १६ हजार १०० हजार पिशवी कांद्याची आवक होऊन चांगल्या प्रतीचा कांदा दहा किलोला ५३५ या उच्चांकी भावाने विकला गेला आहे, अशी माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली. शेतकऱ्यांनी कांद्याची योग्य प्रतवारी करून कांदा बाजार आवारात विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य बाजार आवारात १६ हजार१०० हजार कांदा पिशव्याची आवक झाली. मे. इंदोरे आणि कंपनी आडतदार योगेश इंदोरे यांच्या आडत गाळ्यावर शेतकरी संदीप भगवान थोरात, चांडोली खुर्द यांच्या कांद्याला दहा किलोस ५३५ रुपये असा आत्तापर्यंतचा उच्चांकी बाजारभाव मिळाला. आवक कमी असलेने व उत्तर भारतात कांद्याला मागणी वाढलेमुळे कांद्याच्या बाजारभावात एवढी उच्चांकी वाढ झाल्याचे बाजार समितीचे सचिव सचिन बोऱ्हाडे यांनी सांगितले. दरम्यान या बाजारभावाने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
कांद्याचे दर प्रतिदहा किलोस
सुपर लॉट १ नंबर ५०० ते ५३५ रुपये
सुपर गोळे कांदे १ नंबर ४७० ते ५०० रुपये
सुपर मिडीयम २ नंबर ४२० ते ४७० रुपये
गोल्टी कांदा ३५० ते ४२० रुपये
बदला कांदा १८० ते ३०० रुपये