मंचर – आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील पिंपरी येथे दोघांमध्ये टिंगल मस्करीमध्ये किरकोळ वाद झाला. त्यांना समजवण्यासाठी गेलेले रामचंद्र लक्ष्मण वडेकर (वय 49) यांना ढकलून दिल्याने दगडावर पडून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याप्रकरणी वसंत वडेकर यांच्या विरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पिंपरी येथे तुकाराम शांताराम वडेकर यांच्या राहत्या घरासमोर तुकाराम शांताराम वडेकर, वसंत तावजी वडेकर यांच्यामध्ये टिंगल मस्करीत किरकोळ वाद होऊ लागल्याने तेथे उपस्थित असलेले रामचंद्र वडेकर हे त्यांना समजवण्यासाठी गेले. त्यावेळी वसंत वडेकर यांनी रामचंद्र वडेकर यांना “तू घरी निघून जा’ असे म्हणून ज्योत्यावरून ढकलून दिले. ते खाली दगडावर पडून गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान ससून हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला.