इंदापूर : इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ इंदापूर शहरात बुधवारी महिलांची व पुरुषांची पदयात्रा, जिजाऊ महिला फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शहरातील शेकडो महिला या पदयात्रे सहभागी झाल्या होत्या.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या, शहरातील महिलांचे प्रश्न, व्यापार्यांचे प्रश्न, नागरिकांचे प्रश्न युवकांच्या समस्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडवू शकतो. सर्वधर्मसमभाव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा पवार साहेबांच्या विचाराला आहे. या इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी इंदापूर विधानसभेचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना समाजातील प्रत्येक घटकांनी, मतदान देऊन आशीर्वाद द्यावेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या विचाराच्या महिला, इंदापूर शहरासह तालुक्यामध्ये, काम करताना दिसत आहेत. खर्या अर्थाने खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरण यशस्वी, इंदापूर तालुक्यात राबवण्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यशस्वी काम करतील. महिला भगिनींच्या हाताला काम रोजगार आगामी काळात उपलब्ध करून दिला जाईल यासाठी मतदान देऊन साथ द्यावी. अशी अपेक्षा जिजाऊ महिला फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी व्यक्त केली.