वाघोली: वाघोलीतील जेएसपीएम शैक्षणिक संकुलाच्या शेजारी असणाऱ्या एका प्लॉटिंगच्या अनधिकृत बांधकामावर पोलीस बंदोबस्तात पीएमआरडीएच्यावतीने कारवाई करण्यात आली. प्लॉटिंगमधील रहिवास असणाऱ्या इमारती वगळता काम सुरु असणाऱ्या बांधकामांवर कारवाई झाली.
सकाळी पीएमआरडीएचे अधिकारी, कर्मचारी कारवाई करण्यासाठी दाखल झाल्यानंतर स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
पीएमआरडीए करीत असलेल्या कारवाईला ग्रामस्थांनी विरोध केला होता. करोनाच्या पार्श्वभूमीवर 22 डिसेंबर पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने अतिक्रमण व इतर बाबींमध्ये कारवाई करण्याबाबत मनाई केली असतानाही पीएमआरडीएने चुकीची कारवाई केल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. दरम्यान, या कारवाईमुळे बेकायदा बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.