टाकळी हाजी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोठावळे वस्ती येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. प्रभात फेरी ध्वजारोहण, विद्यार्थी गुणदर्शन कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थी भाषणे, ग्रामस्थ मनोगत, बेटी बेटी बचाओ बेटी पढाओ प्रतिज्ञा, संविधान, राज्यगीत घेण्यात आले.
तालुका वक्तृत्व स्पर्धेत प्रश्नमंजुषा तसेच लोकनृत्य, धावणे, लांब उडी या स्पर्धेत क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांच्या प्रेरणेतून शाळेला मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळाला. यामध्ये गणराज ग्रुपतर्फे शाळेसाठी साऊंड सिस्टिम व जिजाऊ माता गटाकडून विद्यार्थ्यांना घसरगुंडी व सीसॉ साहित्य देण्यात आले.
पेविंग ब्लॉक मलठण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर आप्पा दंडवते यांनी दिले. यानंतर हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमासाठी मलठणचे सरपंच माधुरी थोरात, ग्रामपंचायत सदस्या सोनाली दंडवते, पोलीस पाटील अर्चना थोरात, पत्रकार मनीषा राजगुरू, वैशाली दंडवते व महिला भगिनी उपस्थित होत्या. पर्यावरण संवर्धनासाठी हळदीकुंकू वाण म्हणून रोपे देण्यात आली.
यावेळी व्यवस्थापन समिती अध्यक्ष मच्छिंद्र कोठावळे, उपाध्यक्ष किसन कोठावळे, माजी उपसरपंच विनोद कदम, संतोष कोठावळे, गोरख कोठावळे, रामचंद्र गायकवाड, चेअरमन अलका कोठावळे, प्राचार्य लहू दरेकर, केंद्रप्रमुख अलका दरेकर, मुख्याध्यापिका रंजना बाजारे, शिक्षिका मानसी थोरात, जिजाऊ माता गट, गणराज ग्रुप, नीलम कोठावळे, चंदाराणी थोरात, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कोठावळे वस्ती (मलठण) ः येथील शाळेत हळदी कुंकू समारंभ वेळी उपस्थित महिला .