पुणे जिल्हा: विविध मागण्यांसाठी “गुरव समाज’ राज्यपालांच्या भेटीला

भुलेश्‍वर – राज्यातील गुरव समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची गुरव क्रांती संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट घेतली. गुरव समाजाच्या मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी राज्यपाल कोश्‍यारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन मागण्यांबाबत अनुकूलता दर्शवली. 

यावेळी गुरव क्रांती संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. विवेक गुरव, डॉ. आनंद गुरव, मुकुंद गुरव, शशिकांत गुरव व प्रवीण राजगुरू यांनी राज्यपाल महोदयांना गुरव समाजाच्या व्यथा सांगितल्या. आम्ही गुरव पुजारी समाजातील लोक हे महराष्ट्रातील बहुतांश मंदिरांमध्ये पुजारी म्हणून सेवा देतो. परंतु करोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे व गेल्या अनेक वर्षातील आमच्या समाजाचे व मंदिरांचे अनेक प्रश्‍न आजही प्रलंबित आहेत. 

यावेळी करोना लॉकडाऊन काळातील मंदिरांचे वीजबिल माफ करावे, लॉकडाऊनमध्ये झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई म्हणून मंदिर संस्कृतीवर अवलंबून असलेल्या सर्व समाजाला आर्थिक पॅकेज जाहीर करावे, देवस्थान इनाम वर्ग 3 जमिनींचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, देवस्थान इनाम वर्ग 3 जमिनीवरती कर्ज काढणे, हस्तांतरण करणे, पिककर्ज काढण्यासाठी परवानगी मिळावी, बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऑक्‍ट 1950 मध्ये सुधारणा व्हाव्यात, महाराष्ट्र राज्य देवस्थान व्यवस्थापन समिती स्थापन होऊन त्याद्वारे महाराष्ट्रातील मंदिरांचा विकास व्हावा व महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाला चालना द्यावी, आदी मागण्यांचे निवेदन राज्यपाल महोदयाना देण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.