एकजण पोलिसांच्या ताब्यात तर एक फरार
नीरा – पुरंदर तालुका नीरा येथे ऑनलाइन कर्ज पच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात जेजुरी पोलिसात एक महिला, एका पुरुषा विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर मुख्य आरोपी महिला फरार झाली आहे.
अस्लम ऊर्फ गोंडया सयद मुलाणी असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. तर एक आरोपी महिला फरार आहे. तर रामचंद्र मारूती गायकवाड (वय 42) यांनी जेजुरी पोलिसात फिर्याद दिली आहे.
दोन्ही आरोपींनी मिळून रामचंद्र गायकवाड व अन्य चार चार जणांची ऑनलाइन कर्ज अॅपद्वारे कर्ज काढून त्यांच्या कर्जाचे पैसे परस्पर दुसर्या खात्यावर वर्ग केले आणि त्यांची फसवणूक केली याबाबत फिर्याद दिली आहे.
दरम्यान, मी रक्कम मागितल्यास किंवा कुठे तक्रार केल्या विनयभंगाची तक्रार पोलिसात दाखल करण्याची धमकी महिला आरोपी देत होते. त्यामुळे या महिले विरोधात तक्रार करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. पुढील तपास जेजुरी पोलीस करीत आहेत.