शिरूर (प्रतिनिधी)- शिरूर शहरात गस्त घालत असताना गुप्त माहिती दाराकडून माहिती मिळाल्याने चार जणांच्या सराईत गुन्हेगारांना ए टी एस या पथकाने, शिरूर पोलिसांच्या मदतीने अटक करून त्यांच्याकडून चार गावठी पिस्तुलासह चार जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली आहे.
किरण सोनवणे, सुनील सोनवणे, संतोष मंडले सर्व (राहणार- राळेगण थेरपा तालुका- पारनेर जिल्हा- अहमदनगर) व हर्षराज शिंदे (राहणार- बाभुळसर तालुका-शिरूर जिल्हा-पुणे)या चौघांना, चार गावठी पिस्तुलाशा सह ए टी एस पथकाने शिरूर पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे.
यामुळे शिरूर तालुका व शेजारील पारनेर तालुक्यातील मोठे पिस्तूल रॅकेट सापडण्याची शक्यता निर्माण झाली असून, गेल्या अनेक दिवसांपासून शिरूर तालुका व पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रिवाल्वर गावठी पिस्तुलांचा वापर होत असताना याकडे पोलीस खात्याचे दुर्लक्ष होते.
परंतु मागील दहा दिवसापूर्वी हडपसर पोलिसांना शिरूर येथील तरुणांकडे सापडलेला अठरा पिस्तुलांचा साठा व त्यानंतर पुन्हा शिरूर शहरात पिस्तूल यामुळे शिरूर शहरातील रिवाल्वर संस्कृती आता समोर येत असून याच्या मुळापर्यंत पोलिस जाणार का याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. तोच शिरूर तालुक्यातील रिवाल्वर संस्कृती तालुक्याला घातक असल्याचेही बोलले जात आहे.
पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी अवैध अग्निशस्त्र विरोधी कारवाई तीव्र करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार ATS चे पथक शिरूर परिसरात गस्त घालत असताना खबऱ्यां मार्फत मिळालेल्या माहितीनुसार शिरूर पोलीस स्टेशनच्या मदतीने चार सराईत गुंडांना अटक केली व त्यांच्याकडून चार गावठी पिस्तूल जप्त केले आहे.अशी माहितीदहशतवाद विरोधी कक्ष पुणे ग्रामीण (ATS)चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांनी दिली.