वाघोली : केसनंद ता. हवेली येथील भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष उमेश मोरे यांची पूर्व हवेली भाजप मंडळ अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आव्हाळवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य शरद आव्हाळे यांची चाकण शहर व आळंदी शहर भाजपच्या ग्रामीण मंडल अधिकारीपदी नियुक्ती झाली असून भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किरण दगडे यांनी ही निवड जाहीर केली आहे.
हवेली तालुका सहकार आघाडीचे उपाध्यक्ष या पदावर शरद आव्हाळे यांनी दोन वर्षे कामकाज केले होते.
गेल्या चार वर्षापासून आव्हाळवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी तर पुणे जिल्हा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी शरद आव्हाळे कार्यरत आहेत. उमेश मोरे व शरद आव्हाळे यांच्यावर निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.