भाटघर : शासनाने भोर तालुक्यासह भाटघर धरण परिसरात कोट्यवधी रुपये खर्च करून जंगले राखली आहेत. मात्र दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात अज्ञातांकडून वनवे लावण्याचे प्रकार घडत असल्याने वनव्यात वनसंपदा नष्ट होत आहे तर वन्य प्राण्यांचे हाल होत असुन सरपटणारे प्राणी जळून खाक होत आहेत.
तालुक्यात मागील आठवड्यापासून वनवे लागले जात आहेत या घटनेत विविध प्रकारची वनसंपदा तसेच कीटक पशुपक्षी, सरपटणारे प्राणी जळून खाक होत आहेत. तर वन्यप्राण्यांचे हाल होत असून जीव वाचवण्यासाठी वन्यप्राणी सैरावैरा डोंगरदऱ्यांमध्ये तसेच दिसेल त्या ठिकाणी धावत आहेत. अनेकदा तर वन्यप्राणी जीव वाचवण्यासाठी मानव वस्तीचा आधार घेण्याचा प्रयत्न करीत असतात.
दरवर्षी वणव्यामुळे शेकडो हेक्टर वरील वनसंपदा जळून खाक होत आहे. तर वन्य प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे. वनविभागाने डोंगररांगांना लागलेले वनवे तात्काळ विझवावेत.तसेच वनवे लागू नये म्हणून काळजी घ्यावी तर रात्रगस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
डोंगर रांगांमध्ये लागणारे वनवे यामुळे वनसंपत्तीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी तसेच वन्यप्राण्यांचे वनव्यामुळे होणारे हाल थांबवण्यासाठी वनविभागाने वनव्यांविषयी जनजागृती करावी असे भाटघर धरण परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले.
भाटघर (ता.भोर) : भाटघर धरण शेजारी नेकलेस पॉइंट येथे डोंगराला लागलेला वणवा.