रेडा – पुणे जिल्हा वार्षिक योजनेतून 2020-21 या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत इंदापूर तालुक्यातील चार संस्था व शाळांना कुस्ती व कबड्डी मॅटकरिता 32 लाख तर व्यायामशाळा तसेच साहित्य व जिम साहित्याकरिता 17 लाख 50 रुपये लाख निधी, क्रीडा साहित्य खरेदीकरिता 54 लाख, सर्वसाधारण योजनेअंतर्गत 9 ग्रामपंचायतींना 4 लाख रुपये, 33 संस्थांना क्रीडा साहित्य खरेदीसाठी 84 लाख 50 हजार, असा पाच कोटी 75 लाखाचा निधी शासनाच्या क्रीडा विभागाकडून इंदापूर तालुक्यासाठी मंजूर केल्याची माहिती बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
भरणे म्हणाले की, पुणे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वालचंदनगर विद्यालय 8 लाख रुपये (कबड्डी मॅट) व ज्युनिअर कॉलेज कळंब, केतकेश्वर विद्यालय 8 लाख 90 हजार (कुस्ती मॅट), ग्रामपंचायत अंथुर्णे 8 लाख (कबड्डी मॅट), ग्रामपंचायत भरणेवाडी 8 लाख (कबड्डी मॅट), असे एकूण 4 संस्था, शाळांना कुस्ती व कबड्डी मॅटकरिता एकूण 32 लाख 90 हजार रुपये मंजूर करण्यात आले.
अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत मागास व आर्थिक मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, इंदापूर व निमसाखर व उद्धट ग्रामपंचायतींना प्रत्येकी 7 लाख रुपयांप्रमाणे व्यायामशाळा साहित्यांकरिता 21 लाख रुपये निधी, तसेच अनुसुचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा तरंगवाडी, शासकीय वसतीगृह इंदापूर, जंक्शन, पिंपरी खुर्द, वडापुरी ग्रामपंचायत, झगडेवाडी, भरणेवाडी, अंथुर्णे, हगारेवाडी, वालचंदनगर, शिरसटवाडी, शेळगाव, गोखळी, शहा, वरकुटे, रुई, थोरातवाडी, कुरवली, आनंदनगर अशा एकूण 22 संस्थांना/ ग्रामपंचायतींना प्रत्येकी 7 लाख रुपयांप्रमाणे ओपन जिम व व्यायामशाळा साहित्यांकरिता, असे एकूण 17 लाख 50 रुपये निधी मंजूर करण्यात आला.
इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा, निवासी शाळांना अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा तरंगवाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह, जिल्हा परिषद शाळा विठ्ठलवाडी, शिरसटवाडी, व्याहाळी, शाळा जाधववाडी केंद्र, काटीबीट निमगाव केतकी, बिरोबावाडी, इंदापूर नं. 4, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, काझड, पंधारवाडी, पेटकरवस्ती, पाटीलवस्ती वरकुटे खुर्द, काळेवस्ती केंद्र, निमगांव केतकी, लाकडी, निरगुडे, बिजवडी केंद्र, गलांडवाडी नं. 1, राधिका माध्यमिक विद्यालय अशा एकूण 18 शाळांना/ संस्थांना प्रत्येकी 3 लाख रुपयांप्रमाणे क्रीडा साहित्य खरेदीसाठी 54 लाख रुपये मंजूर केले आहेत.
साहित्य (सर्वसाधारण) योजनेअंतर्गत चाकाटी व कळंब गामपंचायतींना व्यायामशाळा साहित्यांसाठी प्रत्येकी 5 लाख रुपयांप्रमाणे 10 लाख व सणसर, गोखळी पारेकरवस्ती, वकील वस्ती ग्रामपंचायत, शिक्षण प्रसारक मंडळ नीरा नरसिंहपूर चैतन्य विद्या महाविद्यालय, जांब ग्रामपंचायत, शेलारपट्टा पळसदेव शाळा, न्यू भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, काझड आदी एकूण 7 गामपंचायत तसेच संस्थांना ओपन जिम साहित्यांकरिता प्रत्येकी 5 लाख रुपयांप्रमाणे 35 लाख मंजूर करण्यात आले. एकूण 9 ग्रामपंचायत, संस्थांना 45 लाख रुपये मंजूर करण्यात आले.
खास बाब म्हणून जिल्हा वार्षिक योजनेतून पडतस्थळ, पिटकेश्वर, अगोती नं. 2, ढुकेवस्ती, यादववस्ती, अंथुर्णे, धापटेवाडी, सराफवाडी, हनुमानवाडी येथील जिल्हा परिषद शाळा, अशोकनगर (भवानीनगर) ग्रामपंचायत, शेळगांव, करेवस्ती, वडापुरी वस्ती, माळीवस्ती, गोखळी, शिंदेवस्ती (गळाडवाडी नं.2), निमसाखर, गौराईमळा, वायसेवाडी, बारवकर वस्ती, शेळगाव, तेलओढा, भोंगळेवस्ती, हगारेवाडी, भरणेवाडी, झगडेवाडी, हिंगणगाव, हेगडेवाडी, महादेवनगर आदी एकूण 29 शाळा- संस्थांना क्रिडा साहित्य करिता प्रत्येकी 72 50 लाख, तालुका क्रीडा संकुल समिती इंदापूर, एन. ई. हायस्कूल निमसाखर, न्यू भैरवनाथ विद्यालय, काझड, चैतन्य विद्यालय अशा एकूण 4 शाळांना/संस्थांना क्रिडा साहित्यकरिता 12 लाख मंजूर केले आहेत. एकूण 33 संस्थांना क्रीडा साहित्यांकरिता 84 लाख 50 हजार मंजूर करण्यात आले. अंथुर्णे येथे क्रीडा संकुल बांधण्याकरिता 1 कोटी 81 हजार 58 हजार निधी मंजूर केल्याची माहिती भरणे यांनी दिली.