पुणे जिल्हा फुटबॉल स्पर्धा : प्रथम श्रेणी गटात उत्कर्ष क्रीडा मंच संघाला विजेतेपद

-पुणे जिल्हा फुटबॉल संघटना साखळी स्पर्धा 2018-19

– फिनाक्‍यु एफसी, सिग्मय एफसी, टायगर स्पोर्टस्‌ फाऊंडशन संघांना गटविजेतेपद

पुणे – पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीएफए) तर्फे आयोजित साखळी 2018-19 स्पर्धेच्या अव्वल श्रेणी गटामध्ये उत्कर्ष क्रिडा मंच संघाने विजेतेपद मिळवले. फिनाक्‍यु गॉग एफसी, सिग्मय एफसी आणि टायगर स्पोर्टस्‌ फाऊंडशन या संघांनी अनुक्रमे द्वितीय श्रेणी, तृतीय श्रेणी आणि महिला गटाचे विजेतेपद संपादन केले.

पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या (पीडीएफए) ढोबरवाडी येथील मैदानावर हे सामने झाले. प्रथम श्रेणी गटाच्या सामन्यात उत्कर्ष क्रिडा मंच संघाने गोल फरकाच्या आधारे या गटाचे विजेतेपद मिळवले. उत्कर्ष क्रिडा मंच आणि रूपाली फुटबॉल क्‍लब या संघांना साखळी फेरीच्या अखेरीस समान 9 गुण होते. दोन्ही संघांनी 5 सामने खेळले होते. यापैकी दोन्ही संघांनी 2 सामने जिंकले व 3 सामने बरोबरी सुटले. उत्कर्ष क्रिडा मंच संघाने प्रतिस्पर्धी संघावर एकूण 8 गोल केले आणि 4 गोल स्विकारले तर, रूपाली संघाने प्रतिस्पर्धी संघावर एकूण 9 गोल केले आणि 7 गोल स्विकारले. गोल फरकामुळे उत्कर्ष क्रिडा संघाला विजेतेपद मिळाले.

द्वितीय श्रेणी गटात, फिनाक्‍यु गॉग फुटबॉल क्‍लब संघाने 21 गुणांसह विजेतेपद मिळवले. पुणे जिल्हा मध्ये रेल्वे संघाने 16 गुणांसह उपविजेतेपद मिळवले. तृतीय श्रेणी गटात सिग्मय फुटबॉल क्‍लब संघाने 16 गुणांसह विजेतेपद मिळवले. केशव माधव प्रतिष्ठान संघाने 11 गुणांसह उपविजेतेपद मिळवले.

महिला गटाच्या अंतिम सामन्यात टायगर स्पोर्टस्‌ फाऊंडेशन संघाने डेक्कन इलेव्हन संघाचा 2-0 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. टायगर संघाच्या पुर्वा एस. आणि ऐश्‍वर्या जगताप यांनी नोंदविलेल्या गोलांच्या जोरावर विजय मिळवला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.