भवानीनगर -हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचा वाढदिवस काटेवाडी येथे विविध सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरक मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुनेत्रा पवार यांच्या वाढदिनी कार्यकर्त्यांनी बारामती तालुक्यात सामाजिक उपक्रम, वृक्षारोपण करण्यात आला. यावेळी पर्यावरणाचा जागर करण्यात आला.
काटेवाडी गावात सकाळी पालखी ओटा येथे ज्येष्ठ नागरिक संघ व काटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माई किसान मंचचे अध्यक्ष एकनाथ काटे, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, सरपंच विद्याधर काटे, उपसरपंच धीरज घुले, बारामती मार्केट कमिटीचे माजी सभापती संजय काटे,
श्री छत्रपती साखर कारखान्याचे माजी संचालक संजय काटे, कामगार संचालक बारामती तालुका सहकारी दूध संघाचे प्रकाश काटे, शितल काटे, दत्तात्रय काटे, पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष जितेंद्र काटे, ग्रामपंचायत सदस्य राजू भिसे, दीपक वाघमोडे, सदाशिव जाधव, प्रकाश काटे, राजेंद्र सोलनकर, पोलीस पाटील सचिन मोरे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे उपस्थित होते.
काटे म्हणाले की, माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली हायटेक टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी गावासाठी योगदान दिले आहे. त्यांच्या योगदानामुळेच काटेवाडीचे नाव संपूर्ण राज्यामध्ये विकासाबाबत घेतले जात आहे.
केवळ सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी गावात स्वतः पुढाकार घेऊन सर्व ग्रामस्थांना, युवकांना बरोबर घेऊन सामाजिक काम केले आहे. त्यामुळे काटेवाडी गावाला राज्यातील ग्रामस्वछतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. हे काटेवाडीकर कधीच विसरू शकणार नाहीत. यावेळी सुनेत्रा पवार यांना ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.