पोलिसांना शिवीगाळ : पालखी मार्गावर वाहनांच्या दोन किमीपर्यंत रांगा
नीरा – ऊस तोडणी हंगाम शेवटच्या टप्पयात असताना सोमवारी (दि. 16) नीरा परिसरातील शेवटची खेप टाकताना डी.जे सह मिरवणूक काढली. पण नीरा शहरात वाहतूककोंडी झाल्यानंता पोलिसांनी हटकले असता ऊसतोडणी कामगारांची व पोलीसांची तू तू मैं मैं झाली नंतर अक्षरशः पोलिसांवर आरेरावी करत मद्यधुंद कामगारांनी दहशत माजवली. पोलीस शिपायांना अक्षरशः गचांडत मागे सारले. तसचे जमावाने शिवीगळ केली. हे सर्व नागरिकांच्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाले. दरम्यान, या घटनेनंतर पोलीस आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चुप्पी साधली असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दर वर्षी एप्रिलमध्ये संपणार ऊस गळीत हंगाम या वर्षी मे महिन्याच्या 15 तारखेनंतरही सुरू होता. सोमवारी नीरा परिसरातील हरणी, जेऊर, मांडकी, पिसुर्टी, पिंपरे (खुर्द) येथील ऊस तोडणी करणारे वाहतूकदार मजूर व ट्रॅंक्टर चालक यांनी आधी अरुंद पालखी मार्गावर व नंतर नीरा ग्रामपंचायत कार्यालय ते बुवासाहेब चौक दरम्यान डि.जे. सह मिरवणूक काढली. यावेळी ऊस तोडणी मजूर मोठ्य प्रमाणावर मद्यधूंद होते. ही मिरवणूक ऐन सायंकाळी निघाल्याने नीरा शहरात वाहतूककोंडी झाली होती. पालखी मार्गावर तर दोन किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती.
नीरा शहरात वाहतूक कोंडी झाल्याचे नीरा पोलिसांना कळताच पोलीस हवलदार संदीप मोकाशी, निलेश करे, निलेश जाधव यांनी ट्राफिक मोकळे करण्याच्या उद्देशाने कारवाई करण्यास सुरुवात केली. आधी डि. जे. वाल्याला पिटाळण्यात आले. तरही ट्रॅक्टर चालक व मजूर भर बाजारपेठेत रस्ता आडवून नाचत होते.
खाकी वर्दीवर टाकलेला हात महागात पडणार?
नीरेतील पोलीस शिपायांना आरेरावी केल्याची माहिती नीरा पोलीस दूरक्षेत्राचे सहायक उपनिरीक्षक कैलास गोतपागर यांना समजताच शासकी गाडी घेऊन ते ही बुवासाहेब चौकात दाखल झाले. परिस्थीती पाहता गोतपागर यांनी शब्दांचा मारा करत या सर्वांना पिटाळले. पण खाकी वर्दिवर टाकलेला हात किती महागात पडतो ही पाहणे आत औत्सुक्याचे झाल्याचे नीरा बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून बोलले जात आहे.